‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ची बॉक्स ऑफिसवर भक्कम कमाई; पहा पहिल्या दिवसाची कमाई

0

नवी दिल्ली:’मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’च्या सिरीजमधील अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम हा शेवटचा चित्रपट असून या चित्रपटाची गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदरच कोट्यावधी रुपयांची तिकिटे बूट झाली होती. केवळ भारतातच नव्हे तर देशभर या चित्रपटाला फॅन फॉलॉव्हिंग असून हा चित्रपट नुकताच जगभरामध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. पहिल्याच दिवशी चित्रपटाने भक्कम कमाई केली. भारतात पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 50 कोटी रुपये कमावले आहेत. कोणत्याही हॉलिवूड चित्रपटाने आजवर पहिल्याच दिवशी इतकी कमाई केली नव्हती.

अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम हा चित्रपट काल इंग्रजी, हिंदी, तमीळ आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला असून हा चित्रपट 2500 स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. Avengers Infinity War या अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम या चित्रपटाचा प्रीक्वल असलेल्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 31.30 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 222.69 कोटी कमावले होते. या चित्रपटाने आतापर्यंत सगळ्यात जास्त कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम हा रेकॉर्ड मोडेल असे म्हटले जात आहे.