दोन दिवसात ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ची तुफान कमाई; १०० कोटींचा पल्ला ओलांडला

0

नवी दिल्ली: ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा हॉलिवूड चित्रपटाची प्रेक्षक खूप दिवसांपासून प्रतीक्षेत होते. दोन दिवसापूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटात ५० कोटींची कमाई केली आणि दुस-या दिवशीही इतकाच गल्ला जमवत, १०० कोटींपर्यंत मुसंडी मारली. भारतात आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या हॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत एक अनोखा विक्रम या चित्रपटाने नोंदविला आहे.

ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने ५३.१० कोटी रूपयांचा बिझनेस केला. दुस-या दिवशी कमाईत थोडी घट झाली. पण तरीही चित्रपटाने ५१.४० कोटी कमावले. याचसोबत ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’च्या दोन दिवसांच्या कमाईचा एकूण आकडा १२४.४० कोटींवर पोहोचला. ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा हॉलिवूडपट भारताच्या २८४५ स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडच्या मोठ-मोठ्या चित्रपटांपेक्षा अधिक स्क्रिन्स ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ला मिळाल्या आहेत. ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ने एस एस राजमौली दिग्दर्शित ‘बाहुबली 2’लाही मागे टाकले. ‘बाहुबली 2’ने पहिल्या तीन दिवसांत १०० कोटींची कमाई केली होती. ‘बाहुबली 2’ने दोनचं दिवसांत १०० कोटींचा आकडा पार केला.