‘एव्हेन्जर एन्डगेम’ची धमाकेदार एन्ट्री; रिलीज होण्याच्या आधीच करोडोंची कमाई !

0

नवी दिल्ली : हॉलिवुड चित्रपट ‘एव्हेन्जर’ सीरीजचा शेवटचा भाग ‘एव्हेन्जर एन्डगेम’ आज प्रदर्शित झाला. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाच्या प्रतिक्षेत होते. हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांमध्ये इतकी उत्सुकता आहे की चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. ‘एव्हेन्जर एन्डगेम’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरु करताच काही तासांच्या आतच तब्बल ६ कोटी तिकीटांची विक्री झाली आहे.

आतापर्यंत ‘बाहुबली २’च्या नावे सर्वात मोठ्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा रेकॉर्ड आहे. परंतु ज्याप्रकारे ‘एव्हेन्जर एन्डगेम’ने भारतात आपला प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. त्यानुसार ‘एव्हेन्जर एन्डगेम’ ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ‘एव्हेन्जर एन्डगेम’ हिंदीसह तमिळ आणि तुलुगूमध्येही प्रदर्शित होत असल्याने चित्रपटाला आणखी फायदा होणार आहे.

‘एव्हेन्जर एन्डगेम’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहून हा चित्रपट बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. येत्या महिन्यात बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘ब्लॅक’ ३ मे रोजी तर ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे. परंतु ‘एव्हेन्जर एन्डगेम’ बॉक्सऑफिसवर अशीच कमाई करत राहिला तर या दोन बड्या चित्रपटांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. भारतात हजारो चित्रपटगृहात ‘एव्हेन्जर एन्डगेम’ प्रदर्शित होणार आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या आकड्यांनुसार चित्रपट अनेक रेकॉर्ड तोडण्याची शक्यता चित्रपट समीक्षक इंदर मोहन पनु यांनी वर्तवली आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु आहेत. लहान मुलांसाठी तसे कोणते चित्रपट नसल्याने या चित्रपटासाठी मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटांना फटका बसण्याची शक्यता आहे.