सॉरी अवेन्जर्स पण तुमचा एंडगेम हा निव्वळ भोपळा ठरला…. आमच्या “रेस-२’ ची बरोबरी करणारा तुमचा हा चित्रपट अगदीच फुसका बार ठरला…
कारण जेव्हा ह्याचित्रपटाची बरोबरी जेव्हा अवेन्जर्स पहिल्या भाग सोबत केली जाईल, तेव्हा कळेल की जुनं ते सोनं… अवेन्जर्स एंडगेमला भारतासह संपूर्ण जगात भारी ओपनिंग मिळाली आहे, पहिल्याच दिवशी दोन हजार कोटींचा गल्ला चित्रपटाने जमवला आहे. ट्रेड एक्स्पर्टच्या मते हा चित्रपट भारतात शंभर कोटीच्यावर बिजनेस करेल.
चित्रपटातील कमतरता
चित्रपटाची सर्वात मोठी कमतरता आहे ती लेखक जोडी – क्रिस्टोफर मार्कस आणि स्टीफन मक्फिली यांची संथ कथा आणि दिग्दर्शक जोडी – अन्थोनी आणि जो रुसो ह्याचं भरकटलेल दिग्दर्शन, ज्यामुळे एक चांगला चित्रपट अपेक्षाभंग करतो….. इतर मुद्दे आपल्यासमोर सविस्तरपणे मांडतो..
१. “थौर’ सारख्या सर्वात लोकप्रिय पात्राला “ढेबऱ्या’ (अगदी “सुल्तान’ मधल्या सलमान सारखं) दाखविण्यात विनोद तर नाहीच उलट ते बघतांना त्याची किव येते हे दिग्दर्शकाला का नाही सुचलं का कुणास ठाऊक?
२. इतक्या प्रचंड लोकप्रिय पात्रांची फौज ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सरळ हाताने वाया घातली. सर्व पात्र सरतेशेवटी दिसतात आणि तेही मोजून काही सेकंदासाठी… नुसत हे बघण्यासाठी आम्ही इतके पैसे खर्च केलेत का?
३. शेवटची पाच मिनिटे क्रिस्टोफर नोलेनच्या “बैटमैन’ स्टाईलने करण्याच्या नादात दिग्दर्शकाला नेमक काय दाखवायचे आहे, हे कळतचं नाही आणि म्हणून बेचारी जनता शेवटपर्यंत काहीतरी भन्नाट होईल ह्या आशेने काळोख होईपर्यंत सिनेमा बघतात…
४. काहीतरी नवीन आणि वेगळ करण्याच्या नादात, टाइम मशीनने भुतकाळात आणि वर्तमानकाळात येण्या-जाण्याचा नुसता खेळ दिग्दर्शक मांडतो आणि पार अपेक्षाभंग करून इतक्या मोठ्या सिनेमाचा पार बट्याबोळ करून टाकतो….
५. कॅप्टन मार्वलला तर दिग्दर्शकाने अगदी नगण्य महत्व दिल आहे आणि हीच सर्वात मोठी अपेक्षाभंग ठरते. ते पात्र साकारणारी अभिनेत्री ब्री लार्सन स्क्रीनवर मोजून काही मिनिटेच दिसते…
६. तब्बल तीन तासांचा हा बोरिंग चित्रपट शेवटच्या वीस मिनिटांत खिळवून ठेवतो आणि फक्त त्या वीस मिनिटातच काही अंशी म्हणा किंवा मन मारून म्हणा पण पैसे वसूल होतात… निदान वाटत तरी…
चित्रपटाच्या जमेच्या बाजू
१. आयरन मैन, नताशा, नेब्युला आणि रॉकेट-रकून थोडाफार मनोरंजन करतात आणि आपापल्या भूमिका प्रभावीपणे साकारतात…
२. पौल रुडने एंटमैनचं पात्र जबरदस्त साकारलं आहे, त्याचसोबत कॅप्टन अमेरिकाची भावनात्मक भूमिका काही ठिकाणी जमून येते.
३. एका सीनसाठी का असेना पण वूमनपॉवर दाखविण्याचा चांगला प्रयत्न ह्याठिकाणी दिग्दर्शकाने केला आहे, एका सीनमध्ये अवेन्जर्सच्या सर्व महिला पात्र एकसोबत लढतांना दिसतात… अप्रतिम दृश्य!
४. डेविड बार्कर आणि त्याच्या टीमचे स्पेशल इफेक्ट्स खिळवून ठेवतात आणि त्यांची कल्पनाशक्ती एका नव्याच विश्वात नेते. जेफरी फोर्डची एडिटिंग परफेक्ट आहे, मात्र काही सीनवर जर कात्री मारली असती तर बरं झाल असतं.
त्यामुळे ह्या चित्रपटाला माझ्याकडून फक्त दोन स्टार…
– पुनीत शर्मा
www.facebook.com/authorpunit