मुंबई – मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात धुमाकूळ घालणाऱ्या डेंग्यू, लेप्टोपायरेसीस यांचा नायनाट करण्यासाठी पालिकेने आतापासूनच जोरदार पाऊल उचलले आहे तसे प्रयत्न सुरू केले आहेत पावसाळ्यात लेप्टोपायरेसीस व त्यांनतर डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतो असतो. यासाठी महापालिकेतर्फे सीएसटी स्थानकात एका विशेष स्क्रीनवरून डेंग्यूुबाबत तर बेस्टच्या एलईडी स्क्रीनवरून लेप्टोपायरेसीसबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की विविध साथीचे आजार मोठ्या प्रमाणात डोकवर काढत असतात खतरनाक डेंग्यू, मलेरिया , लेप्टो यांचा प्रदुॅभाव प्रप्रचंड असतो याना आवरण्यासाठी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागतेऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर डेंग्यु डोके वर काढतो. या आजाराची निर्मिती कशामुळे होते. त्यांची पैदास रोखण्यासाठी नेमके काय करावे? कोणती खबरदारी घ्यावी आदिंबाबत जनजागृती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी सीएसटी स्थानकात लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या मोक्याच्या भागात स्क्रीन लावण्यात येणार आहेत. जेणेकरून लोकांना ती स्पष्टपणे दिसेल. तसेच बेस्टच्या स्क्रीनवरून लेप्टोपायरेसीसबद्दल जनजागृती केली जाणार आहे. उंदीर, घुशी, कुत्रे, गाई-गुरे यांच्या मलमुत्रामुळे दुषीत झालेल्या पाण्यातून हा आजार होत असल्याने पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून आतापासूनच सुरुवात केली असल्याचे सांगण्यात आलेे. डेंग्यु आणि लेप्टोपायरेसीस या दोन्ही आजाराबाबत ऑगस्ट आणि सप्टेंबरदरम्यान १५ दिवसांसाठी जनजागृती करण्यात येणार आहे. याच कालावधीत् या दोन्ही आजारांचे प्रमाण वाढते. या पाश्र्वभूमीवर मुंबईकरांना या आजारांबाबत योग्य माहिती पोहोचविण्याचे काम महापालिका करणार आहे.