‘नैराश्य’ विषयांवर जनजागृती कार्यक्रम

0

ठाणे : समाजातील मानसिक आजारांबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्याकरीता ९ एप्रिल रोजी डान्स वॉकेथॉन आयोजित केला असून यामध्ये संगीत योगा, सायकलिंग, विविध कला, झुम्बा अशा उपक्रमांची रेलचेल असणार आहे. तसेच “फुलपाखरु- आंनदीपणे जगा व व्यक्त व्हा” असे कार्यकम तीन हात नाका परिसरात सकाळी ६ ते ११ वाजेपर्यत होणार असल्याचे वैद्यकीय अधिक्षक रत्ना रावखंडे, प्रादेशिक मनोरुग्ण, ठाणे यांनी कळविले आहे.

या कार्यक्रमास ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री दीपक सांवत, खासदार राजन विचारे हे उपस्थित राहणार आहेत. सामजिक संस्था सिध्दांत प्रतिष्ठान ठाणे, ठाणे महानगरपालिका, प्रादेशिक मनोरुग्णालय व उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात मनोविकृती चिकित्सा तज्ञाद्वारा वैयक्तिक समस्यांवर चर्चा करुन त्यावर समाधान शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.