नवी दिल्ली – अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमिनीच्या विवादावर आज कोणतीही सुनावणी होणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी आज केवळ तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले.
२९ जानेवारीला नियमित सुनावणीची तारीख निश्चित होणार आहे. त्यानंतर नवीन घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती लळित यांची बेंचमधून बाहेर पडण्याची इच्छा असल्याचे सांगण्यात येत आहे.