अयोध्येत शिवसेनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन !

0

अयोध्या-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यानंतर आज मुंबईकडे रवाना झाले आहेत. दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाना साधला आहे. अयोध्येत शिवसेनेने पहिले राजकीय पाऊल टाकले आहे. अयोध्यामध्ये पहिल्या शिवसेना शाखेचे उदघाटन अदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली.

लवकरच अयोध्या येथे शिवसेना सदस्य नोंदणीची सुरवात होणार आहे.