नवी दिल्ली-बॉलीवुडचे महानायक अभिनेता अमिताभ बच्चन हे आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघ विकत घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त माध्यमात प्रकाशित झाले होते. मात्र महानायक अमिताभ बच्चन यांनी हे वृत्त फेटाळले असून कोणत्याही संघाची भागीदारी किंवा मालकी हक्क घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
यापूर्वी देखील अमिताभ बच्चन हे चेन्नई सुपर किंग्स किंवा राजस्थान रॉयल्स संघात भागीदार होणार असल्याचे सांगितले जात होते. बच्चन कुटुंबियांना खेळामध्ये विशेष आवड आहे. फुटबाल तसेच कबड्डी संघाची मालकी बच्चन कुटुंबीयांकडे आहे. त्यामुळे ते आयपीएल संघ खरेदी करू शकतात असे बोलले जात होते.
संबंधित बातमी-बच्चन कुटुंबीय राजस्थान रॉयल्स संघ विकत घेण्याच्या तयारीत !