चेन्नई :- आयपीएल खेळ म्हटले की नव-नवीन चेहरे व खेळ पट्टीवर होणारी धमाल. दरवर्षी नवीन खेळाडू पाहवला मिळतात तसेच या खेळामध्ये प्रत्येकाचा संघर्ष पाहायला विळतो. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने त्यांना पुन्हा दुसऱ्या वर्षी संधी मिळते. मात्र चेन्नईच्या एका खेळाडूवर समालोचन करण्याची वेळ आली आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून स्पर्धेत एक वेगळेच स्थान मिळवले आहे. संघाने दोनवेळा विजेतेपदही पटकावले आहे. मात्र याच संघाकडून आयपीएल खेळणारा एक खेळाडू निवृत्ती स्वीकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
संधी न मिळाल्याने निवृत्ती
चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू सुब्रमण्यम बद्रीनाथ हा लवकरच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होणार असल्याचे समजते. पुरेशी संधी न मिळाल्याने तो क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्ती स्वीकारणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सध्या बद्रीनाथ आयपीएलमध्ये क्रिकेट तज्ज्ञ आणि तमिळ समालोचक म्हणून काम पाहत आहे. चेन्नईच्या यशस्वी वाटचालीत बद्रीनाथचे मोलाचे योगदान होते. ज्या वेळी चेन्नईला चांगल्या भारतीय फलंदाजांची गरज होती, त्यावेळी बद्रीनाथाने आपल्या फलंदाजीच्या जोरावर चेन्नईला अनेक सामने जिंकवून दिले. मात्र नवोदित खेळाडूंचा उदय आणि कामगिरीत सातत्य राखण्यात बद्रीनाथला आलेले अपयश यामुळे त्याला पुरेशी संधी मिळू शकली नाही. बद्रीनाथ हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तामिळनाडूचा स्टार क्रिकेटपटू आणि कर्णधार होता. मात्र वर्षी काही कारणाने तो प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी झाला नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बद्रीनाथने सुमारे १४ वर्षे तामिळनाडूचे प्रतिनिधित्व केले आणि १० हजार धावांचा टप्पाही पार केला.