मुंबई: बॉलीवूडमधील दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले आयुष्यमान खुराणाच्या मुख्य भूमिकेत असलेला ‘बाला’चित्रपट तीन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. अपेक्षेप्रमाणे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात ‘बाला’ने केली आहे. विकेंड अखेर ‘बाला’ ४० कोटीचा टप्पा ओलांडेल अशी अपेक्षा आहे. शुक्रवार, शनिवारी दोन दिवसात चित्रपटाने २५.८८ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी शुक्रवारी १०.१५ शनिवारी १५.७३ कोटी असे एकंदरीत २५.८८ कोटींची कमाई ‘बाला’ने केली आहे.
पहिल्याच आठवड्यात ४० कोटींची कमाई करणारा आयुष्यमानचा हा तिसरा चित्रपट आहे. ‘बधाई हो’, ‘ड्रीम गर्ल’ आणि त्यानंतर आता ‘बाला’ या तिन्ही चित्रपटाची सुरुवात चांगली झाली आहे.