बाळासाहेब उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी नाहीत मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर

जळगाव |प्रतिनिधी
बाळासाहेब ठाकरे ही देशाची अन् हिंदू समाजाची प्रॉपर्टी आहे. बाळासाहेब ही उद्धव ठाकरेंची स्वतःची प्रॉपर्टी नाही, मान्य आहे ते त्यांचे वडील आहेत. असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.35 वर्षे उद्धव ठाकरेंसोबत काम केले आहे, त्यांचे शब्द मला माहिती आहेत. मात्र, आम्ही रक्त पिणारे नाही, तर रक्त देणारे ढेकूण आहोत असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

बाळासाहेबांच्या नाव वापरू नका, हे पाचव्या सहाव्या वेळेस झाले आहे. त्यामुळे त्या गोष्टीला किती धार द्यावी हे मला तरी वाटते चुकीचे होईल. महापुरुषांचे नाव, फोटो वापरणे हा सर्वांचा अधिकार आहे. बाळासाहेब ही उद्धव ठाकरेंची स्वतःची प्रॉपर्टी नाही, मान्य आहे ते त्यांचे वडील आहेत.मात्र, बाळासाहेब ठाकरे ही देशाची अन् हिंदू समाजाची प्रॉपर्टी आहे, त्यांचे नाव कुणीही वापरू शकते असे म्हणत उद्धव ठाकरेंसोबत मी 35 वर्षे राहिलो आहे, त्यांचे शब्द प्रयोग मला माहिती असून आम्ही रक्त पिणारे नाही तर रक्त देणारे ढेकूण आहोत, असे गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.