सिलीगुडी –बंगाली मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री पायल चक्रवर्ती हिचे निधन झाले आहे. बुधवारी सिलीगुडी येथील एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह आढळला. प्राथमिक पातळीवर पायलने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
‘एक माशेर साहित्य सीरिज’, ‘छोकेर तारा तुई’, ‘गोएंडा गिन्नी’मधून ती झळकली होती. त्याशिवाय तिने बऱ्याच मालिकांमध्ये लहानमोठ्या भूमिकाही साकारल्या होत्या. गेल्या काही काळापासून ती चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीवर लक्ष केंद्रीत करताना दिसत होती.
नुकताच तिचा घटस्फोट झाला होता. दरम्यान, ज्या हॉटेलमध्ये तिचा मृतहेद आढळला त्यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सिलीगुडी चर्च रोड येथील हॉटेलमध्ये तिने प्रवेश केला. बुधवारी सकाळी ती गंगटोक येथे रवाना होणार होती. पण, बराच वेळ दार वाजवूनही आतून काहीच उत्तर न मिळाल्यामुळे अखेर हॉटेलच्या व्यवस्थापकांनी पोलिसांना बोलावलं आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. सध्याच्या घडीला पायलच्या मृत्यूमागचं खरं कारण काय याविषयीच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.