बांग्लादेशचे आफ्रिकेसमोर 330 धावांचे तगडे आव्हान

0

लंडन : विश्वचषक स्पर्धेत चौथा सामना रविवारी 2 रोजी दक्षिण आफ्रिका आणि आशियाई टायगर म्हणून ओळख असलेल्या बांग्लादेश संघात झाला. इंग्लंडविरुद्ध सलामीच्या सामन्यात झालेला पराभव भरून काढण्याच्या इराद्याने आफ्रिकन संघ तर पहिला सामना जिंकून विजयी सुरुवात करण्याच्या मनसुब्याने बांग्लादेश संघ मैदानात उतरला होता. ओव्हल मैदानावर हा सामना झाला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या बांग्लादेशने 6 गडी गमवीत निर्धारित 50 षटकात आफ्रिकेसमोर 330 धावांचे तगडे आव्हान ठेवले. सलामीच्या सामन्यात इंग्लडने दिलेले 312 धावांचे आव्हान न पेलणाऱ्या आफ्रिकन संघासाठी 330 धावांचे आव्हान मोठे आहे. बांग्लादेश संघाच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. नवव्या षटकात फाहलेक्वायोने बांग्लादेशला 60 धावांवर पहिला धक्का दिला.

शकिब-मुशफीकर ऐतिहासिक भागीदारी
बांग्लादेश संघाने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हैराण केले. आफ्रिकेने दिलेले प्रथम फलंदाजीचे आव्हान स्वीकारत बांग्लादेशच्या आघाडीच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. तमिम इक्बाल आणि सौम्या सरकार यांच्या दमदार सलामीनंतर शकिब अल हसन आणि मुशफीकर रहमानच्या मोठ्या भागीदारीने बांग्लादेशला मोठी उभारी दिली. शकिब-मुशफीकर या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यांनी 142 धावांची भागीदारी करून विक्रमाला गवसणी घालती. वर्ल्ड कप स्पर्धेतील ही बांगलादेशच्या फलंदाजांनी केलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. बांग्लादेशकडून मुशफिकुर रहीम याने सर्वाधिक 78 धावा चोपल्या. त्यानंतर शाकीब अल हसनने 84 चेंडूत 75 धावा केल्या.

असे होते दोन्ही संघ
दक्षिण आफ्रिका: फाफ डूप्लेसीस (कर्णधार), ऐडेन मार्करम, क्विंटन डी कॉक, रस्सी वन डेर, जे.पी.ड्युमिनी, डेविड मिलर, अँडिले फेहलुकवायो, ख्रिश मॉरीस, कागीसो रबाडा, लुंगी गिडी, इम्रान ताहीर

बांग्लादेश संघ: मोर्तझा (कर्णधार), तमिम इक्बाल, सरकार, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम, मोहम्मद मिथुन, महमुदुल्ला, मोसाद्देक हुसैन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहीडी हसन, मुस्तफिझूर रहेमान