ढाका-बांगलादेशचा क्रिकेटपटू आणि एकदिवसीय संघाचा विद्यमान कर्णधार मश्रफी मोर्ताझाने राजकारणातही यशस्वी एन्ट्री घेतली आहे. काल झालेल्या बांगलादेशच्या ११ व्या संसदीय निवडणुकीत मोर्ताझाने नरेल मतदारसंघातून विजय मिळवला आहे. अवामी लीगच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या मोर्ताझाने आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा ३४ टक्के अधिक मते मिळवली.
मोर्ताझाला अडीच लाख मते मिळाली आहेत. तर ओयक्या फ्रंट आघाडीचे फरिदुज्जामनान फरहाद यांना अवघे ८ हजार मते मिळाली. ‘नरेल एक्स्प्रेस’नावाने मोर्ताझा प्रसिद्ध आहे.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बांगलादेशातील जनतेची सेवा करायची इच्छा असून यासाठी राजकारण जाणेच चांगले आहे, असे ३५ वर्षीय मोर्ताझाने यापूर्वी म्हटले होते.