बांगलादेशाच्या माजी पंतप्रधानांच्या पुत्रासह १८ जणांना जन्मठेप

0

ढाका- बांगलादेशात २००४ मध्ये झालेल्या ग्रेनेड हल्लाप्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा मुलगा तारिक यांच्यासह इतर १८ जणांना आज जन्मठेपेची शिक्षा ठोठविण्यात आली आहे. ढाक्याच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली खालिदा झिया या तुरुंगात आहे.

बांगलादेशात २००४ मध्ये झालेल्या या ग्रेनेड हल्ल्यातील स्फोटात २४ जण ठार झाले होते. तर, तत्कालीन विरोधीपक्ष नेत्या शेख हसीना यांच्यासह ५०० लोक जखमी झाले होते. या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांपैकी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) वरिष्ठ उपाध्यक्ष रेहमान यांचाही समावेश असून ते सध्या लंडनमधील एक्साईल येथे वास्तव्यास आहेत. तर माजी गृहराज्यमंत्री लुत्फोजमन बाबर यांचाही शिक्षा झालेल्यांमध्ये समावेश आहे.

तपासाअंती हे सिद्ध झाले आहे की, बीएनपीप्रणीत सरकार आणि रेहमान हे या स्फोटाचे सूत्रधार असून हरकातूल जिहाद अल इस्लामी या दहशतवादी संघटनेच्या हल्लेखोरांना या स्फोटाची जबाबदारी सोपवली होती.

दरम्यान, २४ ऑगस्ट २०१४ रोजी अवामी लीगने काढलेल्या शांतता रॅलीवर दहशतवाद्यांनी १३ ग्रेनेड फेकले होते. यामध्ये अवामी लीगचे २४ नेते, कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी यात ठार झाले होते. मृतांमध्ये दिवंगत राष्ट्रपती झिल्लूर रेहमान यांच्या पत्नीचाही समावेश होता. तर इतर ५०० जण गंभीर जखमी झाले होते. यांपैकी अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत. या हल्ल्यातून शेख हसीना या थोडक्यात बचावल्या होत्या. मात्र, स्फोटाच्या मोठ्या आवाजामुळे ते ऐकण्याची क्षमता गमावून बसल्या.