ढाका-बांग्लादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागांवर विजय मिळवीत अवामी लीग पक्षाने सरकार स्थापन केली आहे. अवामी लीग पक्षा अध्यक्षा शेख हसीना पुन्हा एकदा पंतप्रधान बनल्या आहेत. दरम्यान त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती एम अब्दुल हामिद यांनी त्यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत मंत्र्यांचा देखील शपथविधी पार पडला. शेख हसीना ४६ मंत्र्यांसह तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या आहेत. ३० डिसेंबरला निवडणूक झाली होती.
यावेळी मंत्रीमंडळात २० नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.