मुंबई-ग्राहकांनी बँकेशी संबंधित कामे २० तारखेच्या आधीच उरकून घ्यावे लागणार आहे. संप आणि इतर सुट्ट्या त्यामुळे बँका ५ दिवस बंद राहणार आहे.
२१ डिसेंबर रोजी दरम्यान बँक कर्मचाऱ्यांबाबत केंद्राच्या नीती विरोधात ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. वेतनवाढ आणि बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँक यांच्या विलयाच्या निर्णयाला विरोध यासाठी बँकांकडून संपाचे हत्यार उगारण्यात आले आहे.
२१ डिसेंबर रोजी संप, २२ आणि २३ डिसेंबर रोजी चौथा शनिवार, रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. २४ डिसेंबर रोजी बँका सुरु राहणार आहे. पुन्हा २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसनिमित्त सुट्टी आणि २६ डिसेंबर रोजी युनायटेड फोरमने पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.