विद्यापीठात दाखवणार बीबीसीची डाक्युमेंटरी

नवी दिल्ली | प्रतिनिधी

पश्चिम बंगालच्या विश्वभारती विद्यापीठाचा गुरुवारी दीक्षांत समारंभ आहे. ज्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या एका गटाने बीबीसीची वादग्रस्त डॉक्यूमेंट्री इंडिया द मोदी क्वेश्चन,प्रसारित करण्याची घोषणा केली आहे. बोलपूर पोलिसांनी डॉक्युमेंट्रीचे प्रसारण करण्यास कोणतीही परवानगी दिलेली नाही. मात्र, या विद्यार्थ्यांच्या गटाने त्याचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तसे न करण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे बीरभूम भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष धुरबा साहा यांनी असे कृत्य करणे म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.