नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचा प्रथम श्रेणीतील क्रिकेटर आणि आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर संघाकडून खेळणारा क्रिकेटपटू रिंकू सिंह याने बीसीसीआयची परवानगी न घेता अबुधाबी संघाकडून टी-२० सामना खेळल्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बीसीसीआयने ही कारवाई परवानगी न घेता अबुधाबीकडून खेळणाऱ्या खेळाडूचे निलंबन करण्यात आले आहे. तीन महिन्यासाठी त्याचे निलंबन करण्यात आले आहे.