बीसीसीआयकडून खेळाडूंच्या मानधनाची यादी जाहीर; बघा कोणाला किती मानधन?

0

मुंबई – भारतीय क्रिकेट खेळाडूंना मिळणारे मानधन पाहुल चक्रावल्या शिवाय राहणार नाही. बीसीसीआयने खेळाडूंना देण्यात आलेल्या मानधनाची याजी जाहीर केली आहे. यात सर्वाधिक मानधन कर्णधार विराट कोहली घेतो. विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी आणि आयसीसीच्या मॅच फी मधील अशी एकूण 1 कोटी 25 लाख 4, 964 रक्कम बीसीसीआयने दिली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा संपण्याच्या मार्गावर आहे. पाचव्या आणि अखेरच्या कसोटीतही भारतीय संघ पराभूत होण्याची शक्यता आहे.

या मालिकेतील संघाच्या कामगिरीनंतर टीका होता आहे. त्यात त्यांना मिळणाऱ्या मानधनाची रक्कम समोर आल्यानंतर टीकेची धार अधिक तीव्र झाली आहे. त्यात बीसीसीआयने खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक मार्गदर्शक आणि एजेंसी यांना देण्यात आलेल्या मानधनाची यादी जाहीर केली. बीसीसीआयने प्रथमच अशी यादी जाहीर केली आहे.

विराट कोहलीचे
₹ 65,06,808 : दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी दौऱ्यावरील मॅच फी
₹ 30,70,456: दक्षिण आफ्रिकेच्या वन डे मालिकेतील मॅच फी
₹ 29,27,700 : कसोटी क्रमवारीमधून आयसीसीकडून मिळणारे मानधन

हार्दिक पांड्या
₹ 50,59,726: जानेवारी ते मार्च 2018 मधील रिटेनरशिप फी
₹ 60,75,000: ऑक्टोबर ते डिसेंबर 2017 मधील रिटेनरशिप फी

चेतेश्वर पुजारा
₹ 29,27,700: कसोटी क्रमवारीतून आयसीसीकडून मिळणारे मानधन
₹ 60,80,725: दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी दौऱ्यावरील मॅच फी
₹ 92,37,329: ऑक्टोबर ते डिसेंबर 2017 मधील रिटेनरशिप फी
₹ 1,01,25,000: जानेवारी ते मार्च 2018 मधील रिटेनरशिप फी

इशांत शर्मा वेतन
₹ 55,42,397: जानेवारी ते मार्च 2018 मधील रिटेनरशिप फी
₹ 29,27,700: कसोटी क्रमवारीतून आयसीसीकडून मिळणारे मानधन
₹ 48,44,644: दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी दौऱ्यावरील मॅच फी

जस्प्रीत बुमरा
₹ 1,13,48,573: जानेवारी ते मार्च 2018 मधील रिटेनरशिप फी
₹ 60,75,000: ऑक्टोबर ते डिसेंबर 2017 मधील रिटेनरशिप फी

पहा कोणाला किती मानधन?