भारतीय संघाच्या कामगिरीवर बीसीसीआय ‘जामखुश’; प्रत्येक खेळाडूंना देणार १५ लाख !

0

नवी दिल्ली-भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघादरम्यान झालेल्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा २-१ अशा फरकाने पराभव करत ७२ वर्षात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात मालिका विजय मिळविला. भारतीय संघाच्या या कामगिरीवर बीसीसीआय जामखुश आहे. बीसीसीआयने खेळाडूंना मालामाल करण्याचा निर्णय घेतला आहे. या संघातील प्रत्येक खेळाडूला भरभरून रोख रक्कम देण्याची घोषणा बीसीसीआयने आज मंगळवारी केली.

विजयी संघातील अंतिम अकरा खेळाडूला प्रत्येकी १५ लाख रुपये मिळणार आहेत. राखीव खेळाडूंना प्रत्येकी ७.५ लाख रुपये मिळणार आहेत. या बक्षीस रकमेचा सर्वाधिक लाभ मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना झाला आहे. त्यांच्यासह अन्य प्रशिक्षकांना प्रत्येकी २५ लाख रुपये मिळणार आहेत. अन्य सहाय्यक कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनानुसार बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा प्रशासकीय समितीने केली.