सौरव गांगुलीला ‘हार्ट अटॅक’; सायंकाळी अँजिओप्लास्टी

0

कोलकाता: बीसीसीआयसि अध्यक्ष तसेच भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याला उपचारासाठी कोलकातातील वूडलँड हॉस्पिटलला  दाखल करण्यात आले आहे.  त्याच्यावर आज सांयकाळी अँजिओप्लास्टी होणार आहे. सकाळी जीममध्ये त्यांना चक्कर आल्याने आणि छातीत दुखायला लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वृत्ताने क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीटकरून सौरव गांगुली यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

BCCIचा अध्यक्ष झाल्यानंतरही गांगुलीनं अनेक चांगले उपक्रम राबवले. त्याच्या नेतृत्वाखाली कोरोना संकटातही इंडियन प्रीमिअर लीग यूएईत यशस्वीरित्या पार पडली. गांगुलीनं ११३ कसोटीत ४२.१७च्या सरासरीनं ७२१२ धावा केल्या आहेत. त्यात १६ शतकं व ३५ अर्धशतकं आहेत. ३११ वन डे सामन्यांत ११३६३ धावा त्यांनी चोपल्या. त्यात २२ शतकं व ७२ अर्धशतकांचा समावेश आहे.