नाना पाटेकरमुळे तनुश्री दत्ताने सोडली इंडस्ट्री

0

मुंबई – ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी तनुश्री दत्ता गेल्या काही वर्षांपासून भारताबाहेर राहत होती. आता तिला भारतात परत येऊन २ महिने झाले आहे. आणि तिने अचानक बॉलिवूड सोडून निघून जाण्यामागचा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत तनुश्रीला नाना पाटेकरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर तीने उत्तर दिला २००८मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला होता. त्यानंतर तिच्या जागी राखी सावंतला घेतले होते. या प्रकरणानंतर तनुश्रीला बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले आणि तिने मुंबई सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला. आणि तिने एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. आज तनुश्री बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असली, तरीही आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.