नवी दिल्ली-आगामी निवडणुका या ईव्हीएम मशीनद्वारे आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमांतूनच घेतल्या जातील. देशाला पुन्हा मतपत्रिकांच्या युगात नेणार नाही, अशी ठाम भूमिका मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी घेतली आहे.
आपण ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापरणे सुरुच ठेवणार आहोत. यासाठी राजकीय पक्षांकडून आणि उमेदवारांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्याचवेळी मतदानासाठी मतपत्रिकांचा वापर करण्याचा आग्रह धरणाऱ्या मागण्यांमुळे घाबरणार नाही.
सध्या ईव्हीएमद्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणुकींवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचा संबंध ईव्हीएमशी जोडला गेला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.