पुढील वर्षी भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकाची असेल-जेटली

0

नवी दिल्ली-पुढील वर्षी भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असे भाकीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वर्तविले आहे. तसेच ही उभारी घेताना ब्रिटनलाही भारत मागे टाकेल असेही जेटली यांनी सांगितले आहे. २०४० मध्ये भारताचा तीन विशाल अर्थव्यवस्थांमध्ये क्रमांक लागेल असे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

भारतात दरडोई उत्पन्न हे कमी राहिल मात्र अर्थव्यवस्थेचा आकार प्रचंड मोठा असल्याने ती वेगाने अधिक विकसित होत आहे. या वर्षी आकाराच्या रुपात आपण फ्रान्सला मागे टाकले आहे. पुढील वर्षी आपण ब्रिटनलाही मागे टाकू आणि जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेची नोंद होईल असे जेटली यांनी सांगितले आहे.

जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत खूपच धीम्या गतीने विकसित होत आहेत. त्यांची अर्थव्यवस्ता एक ते दीड टक्क्यांनी वाढत आहे. जर आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकास दरात ७ ते ८ टक्क्यांनी वाढ होत असेल तर या अर्थव्यवस्थांना मागे टाकायला आपल्याला फार काळ लागणार नाही.