मुंबई: विधिमंडळाचे येत्या १७ जून पासून कामकाज सुरु होत आहे. अधिवेशन सुरु व्हायच्या अगोदर राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. या वृत्ताला स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे. विधानसभा निवडणूक लागण्याच्या आत मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या विस्तारात भाजपाच्या कोट्यातील चार, तर सेनेच्या कोट्यातील एक मंत्रीपद रिक्त आहे.
या मंत्रीपदावर कुणाची वर्णी लागते या कडे लक्ष लागले आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट हे लोकसभावर निवडून गेल्याने त्यांचे मंत्रीपद रिक्त झाले आहे. भाजपाकडून किमान चौघांना संधी दिली जावू शकते. काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिले जाणार असल्याचे संकेत आहे. जूनच्या पहिल्या किवा दुसऱ्या आठवड्यात विस्तार होऊ शकतो असे सांगितले जात आहे.
गेल्या दोन वर्षापासून मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असे सांगितले जात होते, पण काही कारणास्तव विस्तार होऊ शकला नाहि. आता विधानसभा निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्या अगोदर विस्तार होईल, चार महिन्यासाठी का होईना मंत्री पद तर मिळू शकते अशी भावना काही नेत्यांनी बोलून दाखवली आहे.