पक्षाचा निर्णय सर्व हिताचा समजून कामाला लागा ; खडसेंची भूमिका जाहीर

0

जळगाव: भाजपने माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना उमेदवारी नाकारत त्यांच्या कन्या जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. एकनाथराव खडसे यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही होते. स्वत: खडसे देखील त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र पक्षाने त्यांन उमेदवारी दिली नाही. याबाबत त्यांची कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर खडसे यांनी आपली भूमिका जाहीर केली. त्यानंतर रोहिणी खडसे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाल्या.

भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत जो आदेश दिला होता त्याचे पालन केलेले आहे. आजही पक्षाने जे आदेश दिले त्याचे पालन केले जाईल. काही आदेश कटू होते परंतु तरीही त्याचे पालन आपण केले आहे. यावेळी देखील पक्षाने रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्याचे आदेश दिले होते. त्याचे पालन आपण करणार असून रोहिणी खडसे यांच्या विजयासाठी काम करण्याचे आवाहन एकनाथराव खडसे यांनी कार्यकर्त्यांना केले.

पक्षाने उशिरा का होईना चांगला निर्णय घेतला असल्याचे खडसे यांनी सांगितले. दुसरा उमेदवार असण्यापेक्षा आपल्या घरातील उमेदवार असलेला केंव्हाही चांगला असल्याचे खडसे यांनी सांगितले. रोहिणीच्या विजयासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन खडसे यांनी केले.