स्वामींनारायण मंदिर सावदा येथे मासिक अमावस्या सत्संगाची सुरवात

शास्त्री भक्तीकिशोरदासजीनी सांगीतले अमावस्येचे महत्व

सावदा (प्रतिनिधी) – सावदा येथील स्वामींनारायण मंदिरात मासिक अमावस्या सत्संगाची सुरवात दि 19 पासून झाली यावेळी

स.गु.शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांनी आशिर्वादपर प्रवचनात अमावस्येचे महत्व सांगितले अमावास्या बदनाम तिथी पण अनेक चुकीचे गैर समज या बाबत समाजात आहे वास्तविक ही लक्ष्मी देवीची तिथी आहे दिवाळी देखील अमावास्येला असते असे सांगितले, तसेच प्रतिदिन जो व्यक्ती मंदिरात दर्शनास येतो त्याचे सर्व दोष नाहीसे होता, मंदिरे मानाला धुणारी वाशिंग मशीन, आहे, येथे मनःशांती लाभते असे सांगितले तसेच प्रत्येक हरीभक्ताचे घरात भगवान स्वामीनारायण यांची वचनामृत व   इतर ग्रंथ घरात ठेवावे व त्याचे नियमित वाचन करावे असे सांगितले

यावेळी स्वामी लक्ष्मीनारायणदासजी, स्वामी धर्मकिशोरदासजी, स्वामी सत्यप्रकासदाससजी, शरद भगत व संतगण उपस्थित होते  कार्यक्रमाची सुरुवात संत पूजनाने झाली महाप्रसादाचे यजमान आर्यन व ईशान नंदकिशोर पाटील यांनी संतपूजन केले, यावेळी सावदा व परिसरात हरीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमा नंतर आरती व उपस्थित भक्तांना महाप्रसाद देण्यात आला, कार्यक्रमा दरम्यान स्वामींनारायण मंदिराचे बॅंक खाते असलेला क्यु आर कोड नुकताच प्राप्त झाला त्याची सुरवात करण्यात आली यामुळे भाविकांना आपली देणगी थेट अधिकृतपणे मंदिराचे असलेल्या बँक खात्यात थेट टाकत येणार आहे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू पाटील सर यांनी केले, दर दरम्यान अमावास्येला हा सत्संग येथे होणार असून भाविकांनी दर अमावास्येला येथे सत्संगा साठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांनी यावेळी केले