प्रेम विवाह केल्याचे रागातून तरुणीच्या नातेवाईका कडून तरुण व त्याचे आई वडील भावास घरात घुसून मारहाण

विवाहित तरुणीस देखील नेले जबरजस्ती सोबत

सावदा (प्रतिनिधी) – सावखेडा येथील एका तरुणाने प्रेम विवाह करून जळगाव येथील एका प्रथितयश राजकारणी नातेसंबंध असलेल्या तरुणीस विवाह करून घरी आणले होते मात्र याचा राग तरुणीच्या नातेवाईक यांना आल्याने त्यांनी दि 19 रोजी सावखेडा येथे जाऊन तरुणाचे घरात घुसून तरुणास त्याचे आई वडील व नातेवाईक   यांना मारहाण करून तरुणीस तिची इच्छा नसतांना तीस घेऊन जाऊन तिचे अपहरण केले अशी फिर्याद प्रफुल्ल रमेश पाटील वय 26 यांनी दिली आहे

या बाबत फिर्यादीची फिर्याद की, वरील नमुद तारखेस वेळी व ठिकाणी दि 19/05/2023रोजी दुपारी 01.30 वाजेच्या सुमारास माझ्या घरी सावखेडा गावात माझ्या घरी मी प्रेमविवाह करुन आणलेली माझी पत्नी नामे मोहिनी भगवान पाटील आई , वडील, भाऊ व आजी, आजोबा असे सर्व घरात हजर असतांना मी प्रेमविवाह करुन आणलेली नामे मोहिनी भगवान पाटील हिच्या सोबत आम्ही दोघांनी आमच्या मर्जिने जळगाव येथुन जावुन ब-हाणपुर येथिल न्यायालयता नोटरी पध्दतीने लग्न लावुन गायत्री संस्कार ट्रस्ट रेणुका नगर ब-हाणपुर येथे नोदनीकृत विवाह केल्याने याचा राग आल्यावरुन तरुणीचे पाच नातेवाईक व इतर सुमारे 20 ते 40 मुले असे चार चाकी वाहन व इतर मोटार सायकल वर येवुन ते सर्व घरात घुसुन त्यांनी त्यांचे हातातील लोखंडी राँडने घरातील सामनाची नासधुस केली. आणि माझ्या आई वडीलांना त्यांचे हातातील लोखंडी रॉडने मारत असतांना माझा भाऊ प्रज्वल याने त्यांना आडवले असता त्याचे तोंडावर व डाव्या हाताच्या पंजास दुखापत केली.आणि ओढातानीत माझ्या आईच्या गळयातील सोन्याचे पोत तोडुन नुकसान केले. नंतर काही लोकांनी मला व आजी यांना लोखंडी रॉडने अंगावर मारहाण करुन आम्हाला जमिनीवर ढकलुन दिले. आणि मी प्रेम विवाह करुन आणलेली नामे मोहिनी भगवान पाटील हिची इच्छा नसतांना तिचा हात धरुन बळजबरीने घरातुन ओढत आणुन तिचे अपहरण करुन त्यांनी सोबत आणलेल्या पांढ-या रंगाच्या कारमध्ये बसवुन जळगाव येथे घेवुन गेले.म्हणुन गुन्हा वैगरे मजकुराचे फिर्यादी वरुन सावदा पोलीस स्टेशनला CCTNS गुरनं. 109/2023, भादवि कलम 365,143,148,149,452, 324,427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सावदा पोलीस करीत आहे