जळगाव: जिल्हापरिषद शाळेतील शिक्षकांच्या पदोन्नतीला, बदलीला आज जुन्या जिल्हा परिषद मध्ये सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळी या साठी शिक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळाली. आपल्या आवडत्या ठिकाणी बदली व्हावी म्हणून शिक्षक प्रयत्नशील असल्याचे दिसून आले. दरम्यान काही गोंधळ उडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
काही शिक्षकानी राजकीय फिल्डिंग लावली असल्याची चर्चा करतांना दिसून आले. अप- डाऊन ला त्रास होतो. आवडत्या ठिकाणी बदली झाली तर त्या ठिकाणी आरामात राहता येईल. भरपूर वर्ष बाहेर गावी काढले, आता काही शेवटची वर्ष आपल्या जन्मगावी काढण्याची इच्छा आहे. अशीही चर्चा या वेळी उपस्थित शिक्षकां मध्ये रंगली.