पराभवानंतरही इंग्लंड बादफेरीत दाखल !

0

रशिया-बेल्जियम संघाने शानदार कामगिरी करत फिफा विश्वचषकातील ‘ग’ गटातील सामन्यात इंग्लंडला १-० ने पराभूत केले. या विजयाबरोबर ‘ग’ गटात बेल्जियम संघाने अव्वलस्थानी राहत बादफेरीत प्रवेश केला. इंग्लंडचा पराभव होऊनही त्यांनी बादफेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान या गटातून ट्युनिशिया आणि पनामा हे दोन्ही संघ स्पर्धेबाहेर फेकले गेले आहेत. ट्युनिशियाने गटातील अंतिम सामन्यात पनामाचा २-१ ने पराभव केला.

बादफेरीत इंग्लंडचा कोलंबियाशी ३ जुलै रोजी सामना होईल. तर बेल्जियमचा संघ जपानविरोधात २ जुलैला भिडेल. जिंकणारा संघ उप-उपांत्य फेरीत प्रवेश करेल. कलिनिंग्राड स्टेडिअमध्ये गुरूवारी रात्री झालेल्या या सामन्यात दोन्ही संघानी चांगली कामगिरी केली. दोघांनाही चांगल्या संधी प्राप्त करता आल्या तसेच त्यांचे संरक्षणही उत्कृष्ट होते.

पहिला हाफ ०-० असा गोलरहित राहिला. त्यानंतर बेल्जियमच्या अदनान जानुझाजने ५१ व्या मिनिटाला गोल केला. हा गोल निर्णायक सिद्ध झाला. बेल्जियमने याच गोलच्या जोरावर सामना १-० ने जिंकला. इंग्लंडने यंदाच्या विश्वचषकात पहिल्या सामन्यात ट्युनिशियाला २-१ ने पराभूत केले होते. त्यानंतर पनामाला ६-१ अशा मोठ्या अंतराने धुळ चारली होती. तर बेल्जियमने आपल्या पहिल्या सामन्यात पनामाचा ३-० ने पराभव केला. तर ट्युनिशियावर ५-२ ने मात केली होती.