सरपंचाला अडकविण्यासाठी पित्याकडुन मुलाच्या अपहरणाचा डाव

0

पोलीसांनी खाक्या हिसका दाखविताच पित्याने दिली गुन्ह्याची कबुली

भडगाव(प्रतिनिधी)- सरपंचला अपहरणाच्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी पित्यानेच मुलाच्या अपहरणाचा डाव रचल्याची कबुली खुद्द पित्यानेच दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान अपहरणाचा बनाव पोलिसाच्या चौकशीत उघड झाल्याची त्यांनी सांगितले.
पाचोरा तालुक्यातील सार्वे येथिल सरपंच व मुलाचे वडील विजय आधार पाटील यांच्यात विहीरच्या कारणावरुन आपसातील वादामुळे विजय पाटील यांचा १६ वर्षाचा मुलगा गणेश विजय पाटील हा ६ एप्रिल रोजी कजगाव येथुन बेपत्ता झाल्याची तक्रार भडगाव पोलिसात देऊन सरपंचानेच अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. विजय आधार पाटील यांनी नातेवाईकांना व मित्राला अंधारात ठेवुन शिरपुर तालुक्यातील वाडी गावातील सतीश शांताराम दुधेकर यांच्याकडे डांबुन ठेवले होते. हवा पाणी बदल होईल काही दिवस मुलाला तुझ्याकडे राहु दे असे सांगुन मित्राला देखिल या प्रकरणी अनभिज्ञ ठेवले. मुलाचा अपहरणाचा बनाव रचतांना कुठल्याही सीसीटीव्हीत मुलासोबत दिसणार नाही याची मात्र खबरदारी पुरेपूर घेतलेली होती. मुलाला गाडीत बसवुन वडील विजय पाटील हा दुसर्‍या मार्गाने गेला होता. पोलिसांच्या तपासणीत फिर्यादी विजय पाटिल यांच्या सांगण्यात विसंगती जाणवत असल्याची पोलिसांना शंका आली. पोलीसांनी खाक्या हिसका दाखविताच विजय पाटील याने सरपंचाला अडकविण्यासाठीच मुलाच्या अपहरणाचा बनाव केल्याचे कबुल केले. दरम्यान संशयित विजय पाटील यास अटक करण्यात आली आहे. त्याची कसुन चौकशी केल्यावर सरपंचला अडकळवण्या साठीच स्वताच्या मुलाचाच अपहरणाचा बनाव रचल्याचे निषन्न झाल्याने आरोपीस अटक करण्यात आले आहे. पो.नि.धनजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाडुरंग सोनवणे व तात्याबा नागरे यांनी तपास केला.