भडगाव तहसीलदारांनी पकडले 6 ब्रास अवैध वाळू भरलेले डंपर
भडगाव | प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील व शहरातील गिरणा नदी पात्रातून सर्रास अवैध वाळू उपसा सुरू असून या बाबत भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे व त्यांच्या पथकाने काल मध्यरात्री गिरणा नदी पात्रातून सहा ब्रास अवैध वाळू भरलेला दहा टायरी डंपर वडधे गावाजवळ पकडला. हा डंपर गणेश प्रभाकर पाटील रा. देवळी ता चाळिसगाव ह. मु खरजाई नाका चाळीसगाव याच्या मालकीचा होता. या डंपर चे दर महिन्याला दोन तीन वेळेस नंबर बदलतात असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी पथकामध्ये तहसिलदार मुकेश हिवाळे, भडगाव तलाठी अविनाश जंजाळे, तलाठी योगेश ब्राम्हणे, सुनील मांडोळे, संभाजी पाटील, चालक लोकेश वाघ आदी पथकात सहभागी होते. सदरचे डंपर हे भडगाव शासकीय विश्राम गृह येथे जमा करण्यात आले असून यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी दिली आहे.