महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगतसिंह कोश्यारी !

0

मुंबई: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली आहे. सी.विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे. ३० ऑगस्ट २०१४ रोजी विद्यासागर राव महाराष्ट्राचे राज्यपाल झाले होते. त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ ३० ऑगस्टला संपला आहे. भगतसिंह कोश्यारी यांचा जन्म १७ जून १९४२ रोजी झाला. उत्तराखंडमधील भाजपाचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिला आहे. उत्तराखंडमध्ये ते भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते.

तसेच माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान यांची केरळ, तेलंगणा तमिलसाई सुंदरराजन यांची , बंडारू दत्तात्रय यांची हिमाचल प्रदेश, कलराज मिश्र यांची राजस्थानच्या राजपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.