भगवत गीतेतून काम करण्यासाठी बळ मिळते- अक्षय कुमार

0

नवी दिल्ली-बॉलिवूडमधला ‘खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमारने आपल्या कसदार भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. सध्या अक्षय त्याच्या आगामी ‘गोल्ड’ या चित्रपटमध्ये व्यस्त आहे. दरम्यान अक्षय कुमारने त्याला कोठून प्रेरणा मिळते याबाबत खुलासा केला आहे. भगवत गीतेत दिलेल्या उपदेशांचा माझ्या दैनंदिन जीवनात अवलंब केला आहे. त्यामुळे या उपदेशांमुळे माझ्या वागण्या-बोलण्यात, कामात खूप बदल झाले. जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मला गीतेतून मिळाली’, असे अक्षय कुमार सांगतो.

प्रसिद्ध लेखक विजय सिंगल यांच्या ‘भगवद गीता- सेईंग इट दि सिंपल वे’ या पुस्तकाचे अक्षय कुमारच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी अक्षयने भगवद गीतेमुळे त्याच्या आयुष्यात किती अमुलाग्र बदल झाले ते सांगितले.