भारत गणेशपुरे पुन्हा लग्न !

0

मुंबई : विदर्भाचे ब्रॅंड अॅम्बेसेडर भारत गणेशपुरे यांचं आज लग्न आहे. हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला असेल? तर मग 18 वर्षांपूर्वी गानापुरे यांनी कोणासोबत लग्न केले होते असा प्रश्न पडला असेल. ‘चला हवा येऊ द्या’मधील श्रेया बुगडेने भारत गणेशपुरे पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे गणेशपुरे यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. भारत कोणाशी लग्न करणार याबद्दल तर्क लढविले जात आहे. मात्र ते नवीन लग्न करणार असे नाही तर ते त्यांच्या पत्नीसोबतच पुन्हा लग्न करणार आहे.

झाले असे ‘चला हवा येऊ द्या’ची सगळी टीम जगप्रवासाला निघाली. त्यात भारत गणेशपुरे यांना सौम्य हृदय विकाराचा धक्का बसला. भारत यांचा ज्योतिषशास्त्रावर फार विश्वास आहे. त्यांनी तातडीने हात दाखवला. तर तुमची लगीन गाठ अंमळ सैल होतेय की काय अस वाटतं, घट्ट करा. झालं, भारत मायदेशात परतले आणि थेट मुहूर्त काढला.

तब्बल 18 वर्षांनी भारत आपल्या पत्नीसोबत पुन्हा विवाहबद्ध होत आहेत. वहिनी अमरावतीच्याच आहेत. आता संपूर्ण लग्नविधी पुन्हा होणार आहेत, म्हणूनच कालच या दाम्पत्याची हळद झाली. श्रेया बुगडेने फोटोही शेअर केला. आज सायंकाळी भारत आणि आपल्या वहिनीची गाठ अधिक घट्ट होणार आहे. एकदा लग्न झालं की भारत पुन्हा जगप्रवासाला निघतील हे ओघाने आलंच. हं…पण आता यावेळी ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमला एक तिकीट एक्स्ट्रा बुक करायला लागेल हे तुम्हाला काय आम्ही सांगायला हवं काय?