मुक्ताईनगर येथे भारत जोडो अभियान ची बैठक संपन्न

मुक्ताईनगर प्रतिनिधी……

मुक्ताईनगर येथे शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे “भारत जोडो अभियान” ची बैठक घेण्यात आली.सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकसंघर्ष मोर्चा च्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे हे होते.तर प्रमुख उपस्थित ईकरा काॅलेज जळगाव चे अध्यक्ष अ.करीम सालार ,मराठा सेवा संघाचे राम पवार हे होते. सदर बैठकी मध्ये प्रतिभाताई शिंदे यांनी “भारत जोडो अभियान” बाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.वाढती बेरोजगारी, धार्मिक दंगली,जातीय शुद्धीकरण व देशात अनेक सरकारी विभागाचे खाजगीकरण व अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच देशात राजकारणाचे बदलते स्वरुप वाढलेली महागाई किसान आत्महत्या आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.सदर या बैठकीत मुक्ताईनगर येथील विविध पक्षाचे समविचारी संघटनेचे पदाधिकारी व संघटनेचे प्रतिनिधि या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे डाॅ.जगदीश पाटील,निखिल चौधरी,मनियार बिरादरी चे जिल्हा उपाध्यक्ष हकिम आर चौधरी,मराठा सेवा संघाचे दिनेश कदम, बी.डी गवई, अॅड गोसावी, शंकर मोरे,तसेच अजय जैन,बहुजन मुक्ती मोर्चा चे प्रमोद सोदंळे,शेख आरीफ रब्बानी उपस्थित होते.