नवी दिल्ली- अभिनेता वरुण धवनची सलमान खान आणि कॅटरिना कैफ स्टाटर ‘भारत’ सिनेमात एंट्री झाली आहे. ‘भारत’मध्ये वरुण कॅमिओ करणार आहे. अजूनपर्यंत याबाबत काही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अली अब्बास जफरसध्या यासिनेमाच्या दुसऱ्या शेड्यूल शूटिंग अबू धाबीमध्ये होत आहे.
अली अब्बास जफर ‘टायगर जिंदा है’नंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफसोबत पुन्हा एकदा काम करणार आहे. माल्टामध्ये या सिनेमाचे बरेचसे सीन्स शूट करण्यात आले आहेत. दुसऱ्या शेड्यूलसाठी टीम आबू धाबीला पोहोचली आहे. हा सिनेमा ‘ओड टू माई फादर’चा फिशिअल हिंदी रिमेक आहे.
सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल. याकाळात त्याला प्रियांका व त्याचे प्रेम होईल आणि नंतर लग्न.
सिनेमाच्या कथेनुसार, सलमानला आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी सर्कशीत काम करावे लागते. यात तो ‘मौत का कुआँ’मध्ये मोटरसायकलवर चित्तथरारक कसरती करताना दिसेल. त्याच्यासोबत या काळात दिशा पाटनीही दिसेल. दिशाने यात सलमानच्या बहिणीची भूमिका साकारली आहे.