न्हावीच्या भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयास नाशिक विभाग

 शिक्षक आ. किशोर दराडे यांची सदिच्छ भेट 

न्हावी प्रतिनिधी दि 2

भारत विद्यालय व कनिष् महाविद्यालयास नाशिक विभाग शिक्षक आ.किशोर दराडे यांची सदिच्छा भेट दिली त्यांच्यासोबत शिक्षक नेते संभाजी पाटील हे सुद्धा होते त्यांच्या स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष अनिल लढे यांनी त्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले चेअरमन डॉ. किरण जी पाटील, सचिव जयंत लालू बेंडाळे सर्व सन्माननीय संचालक मंडळ समवेत होते. शिक्षक आमदार यांनी शिक्षकांची हितगुज करत असताना आपण कोणत्या पद्धतीने काम करतो त्याचप्रमाणे तुमच्या काही समस्या असल्या तर आपण मला आत्ता सांगाव्या मी आत्ताच त्यांना मार्गी कसा लावता येईल याबद्दल विचारणा केली आणि सांगितले आणि शाळेला एक अद्यावत असं संगणक सुद्धा भेट दिलं त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले संभाजी पाटील यांनी सुद्धा मागील पाच वर्षांमध्ये आमदार यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कशाप्रकारे उपोषण केले कशाप्रकारे रस्त्यावरती उतरले या सर्व गोष्टींच्या आठवणी करून दिल्या यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल लढे आणि चेअरमन डॉ.किरण जी पाटील यांनी त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि आमचा तुम्हाला सदैव पाठिंबा राहील असे सुद्धा आश्वासन दिले शिक्षकांच्या वतीने मुख्याध्यापिका तीलोत्तमा चौधरी यांनी सुद्धा आश्वासन दिले या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अनिल लढे चेअरमन डॉ. किरण जी पाटील सचिव जयंत लालू बेंडाळे विद्यमान संचालक डॉ. प्रमोद पाटील अविनाश पुरुषोत्तम फिरके किशोर तळेले डिगंबर कोलते सागर चौधरी संदेश महाजन मुख्याध्यापिका तीलोत्तमा चौधरी शिक्षक व्ही बी वारके सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एल आर सुपे यांनी केले तर आभार डी पी बोरोले यांनी मानले