जळगांव जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत भुसावळ तालुका स्तरीय आंतर शालेय कबड्डी स्पर्धा 25 सप्टेंबर 2023 रोजी बियाणी मिलिटरी स्कूलच्या मैदानावर संपन्न झाल्या त्यात 19 वर्षा खालील गटात दादासाहेब देविदास नामदेव भोळे ज्युनियर कॉलेज कब्बडी संघाने डी एस ज्युनियर कॉलेज भुसावळ संघाचा 02-25 ने पराभव केला तसेच सेमी फायनल मध्ये महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज वरणगाव यांचा 07-44 स्कोर करून 37 गुणांनी पराभव करून अंतीम सामना मध्ये प्रवेश केला अंतीम सामना नाहटा विरुद्ध भोळे कॉलेज यांच्यात झाला त्यात 12-40 स्कोअर करून 28 गुणांनी विजेतेपद पटकावले याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजू फालक, प्रा डॉ संजय चौधरी, प्रा डॉ अनिल सावळे, प्रा डॉ जे पी सरोदे, प्रा डॉ जे बी चव्हाण,प्रा एस डी चौधरी, प्रकाश सावळे , भुसावळ तालुका क्रीडा समन्वयक राजेंद्र कुलकर्णी, बी एन पाटील, उपमुख्यध्यापक रमण भोळे यांनी अभिनंदन केले या स्पर्धेमध्ये अखिलेश कुट्टरवार, महेश पवार, निशांत वारुळकर, प्रतीक अवसरमल, सद्दाम शेख, भावेश सोनवणे, मंथन वानखेडे, भूषण गुंजाळ भावेश बडगुजर यश इंगळे यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी जळगांव साठी निवड झाली आहे