मुक्ताईनगर प्रतिनिधी……
महिला आर्थिक विकास महामंडळ जळगाव मानव विकास अंतर्गत उन्नती कापडी पिशवी महिला बचत गट मुक्ताईनगर यांच्याकडे उत्पादनाचे मोठमोठे मशनरी व साहित्य आल्यामुळे सदरील होतकरू महिला बचत गटाकडे हक्काची जागा उपलब्ध नसल्याने भाडेतत्त्वावरील महागडे हॉल त्यांना परवडत नव्हते यासाठी त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी करतात आमदारांनी क्षणाचाही विलंबना लावता सदरील महिला बचत गटाला जागेसह निधीचे सभागृह मंजूर करून दिले या कामाचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते शनिवारी दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान पार पडले.
प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख गणेश टोंगे ,नगरसेवक संतोष मराठे, किर्तनकार दुर्गा मराठे ,शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख सरिता कोळी, सुभाष बनिये, नरेंद्र गावंडे, संतोष माळी, विजेंद्र लिहेकर यांचेसह महिला बचत गटाच्या सहयोगीनी मंगला चौधरी, माया तायडे, अध्यक्षा रेखा रवींद्र माळी, रत्ना संजय माळी, अर्चना दुबे, संध्या मगरे, संगीता माळी, रेखा अवतारे, दिपाली जैन, रोहिणी जोगी, वैशाली कोळी, बेबिबाई सोनवणे, प्रतिभा बावस्कर, सुशीला पाटील आणि सुषमा लिहेकर आदिंची उपस्थिती होती.