शिंदखेड्यात नविन विश्रामगृहाचे आमदार रावल यांचे हस्ते भूमीपूजन

निकृष्ट काम चालणार नाही रावल यांचा ईशारा.

शिंदखेडा(प्रतिनिधी)–शिंदखेडा शहरात नव्याने मंजूर करण्यात आलेल्या विश्रामगृहाचे भूमिपूजन आमदार जयकुमार रावल यांचे हस्ते झाले. अंदाजित १०२ लक्ष रूपये खर्च असलेल्या शासकिय विश्रामगृहाचा टेंडर प्रक्रियेतून ७८ लाख रूपयांना ठेका दिला गेला.याबद्दल आमदार जयकुमार रावल यांनी नाराजी व्यक्त करीत २५ लाख कमी रकमेत काय क्वालीटीचे बा़ंधकाम करणार असा सवाल आ.रावल यांनी उपस्थित केला. निकृष्ट काम खपवून घेतले जाणार नाही असा दम ही त्यांनी संबंधित ठेकेदाराला भरला.

येथील पोलीस स्टेशन समोर असलेल्या नव्या विश्रामगृहाच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत अजून हे एक शासकिय विश्रामगृह मंजूर झाले आहे. एक कोटी दोन लाख रूपयांची या कामास मंजूरी आहे.मात्र टेंडर प्रक्रियेत केवळ ७८ लाख रूपयांमधे प्रविण चौधरी यांनी या कामाचा ठेका घेतला आहे.या रकमेत कसे काम करणार त्याचा काय दर्जा असेल अशा शंका आमदार रावल यांनी उपस्थित केल्या.ते म्हणाले विश्रामगृह सहजासहजी कूणाला मिळत नाही. मोठ्या प्रयत्नाने हे आपणास मिळाले आहे.स्वात़ंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात हे काम दर्जेदार होणे अपेक्षित आहे.पुढील पंचविस वर्षात आपला देश महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत ही वास्तू सूंदर आणि दमदार असावी.ती गळकी असली तर ऊपयोग काय? आपल्या गावात पोलीस ठाण्याची वास्तू उभारली गेली.मात्र ती कमी जागेत झाली आहे.पोलीसांसाठी परेड मैदान झाले नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली.या कामाचे काम चांगले करा दर्जेदार करा निष्कृष्ट काम चालणार नाही.अन्यथा करू नका असा ईशाराही त्यांनी संबंधित ठेकेदारासह अधिकार्यांना दिला. ९ महिन्यात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

राहूल जोशी यांचे मंत्रोपचारात

या कामाचे भूमीपूजन झाले.यावेळी गटनेते अनिल वानखेडे,भाजपचे शहर अध्यक्ष प्रविण माळी,उल्हास देशमूख,प्रकाश देसले,युवराज माळी,सुभाष माळी, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर,भिला पाटील,मनोहर पाटील रमेश भामरे,दगा चौधरी आदी उपस्थित होते.