भुजबळांच्या अटकेपासून दाढी केली नाही

0

नाशिक – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांच्या अनेक सुरस कथा चर्चेत येत आहेत. भुजबळांचे खंदे समर्थक बिभीषण माळी याच्याप्रमाणेच भुजबळांचा मतदार संघ असलेल्या नाशिकमध्ये देखील त्यांचे अनेक समर्थक आहेत. येवल्याचे महेश पैठणकर आणि विष्णू कुर्हेकर हे देखील भुजबळ कट्टर समर्थक आहेत. या दोघांनी भुजबळ तुरुंगात गेल्यापासून दाढी केली नाही. ‘जोपर्यंत भुजबळ बाहेर येणार नाहीत, तोपर्यंत दाढी करणार नाही’ असा पणच या समर्थकांनी केला होता.

छगन भुजबळांना १४ मार्च २०१६ मध्ये अटक झाली होती. त्या दिवसापासून या दोघा कार्यकर्त्यांनी दाढीच केलेली नाही. भुजबळांची आठवण कायम राहावी, यासाठी त्यांनी दाढी न करण्याचा निश्चय केला होता. भुजबळ यांच्यावर अन्याय झाला आहे, असे हे समर्थक सांगतात. भुजबळ यांना आता जामीन मंजूर झाला असून, सोमवारी ते बाहेर येतील. तेव्हा त्यांची भेट घेतल्यानंतरच दाढी करणार, असा निर्धार या समर्थकांनी व्यक्त केला आहे.