जामनेर प्रतिनिधी l
तालुक्यातील नेरी पोलीस दूरक्षेत्राला ११३ वर्षांची जुनी शतकीय परंपरा लाभलेली आहे. या जुन्या वास्तूच्या शेजारीच नवीन इमारतीचे भूमिपूजन शुक्रवारी ९ रोजी सकाळी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांचे हस्ते झाले. या इमारतीकरिता पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पाठपुरावा केला आहे.नेरी येथील पोलीस दूरक्षेत्राची इमारत ११३ वर्षे जुनी आहे. याच इमारतीच्या बाजूला नवीन इमारत उभारली जाणार आहे. याकरिता पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. लवकरच इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार असल्याने नागरिकांना सुविधा होणार आहे. इमारतीत अद्यायावत सुविधा निर्माण केल्या जाणार असल्याची माहिती किरण शिंदे यांनी दिली.
या इमारतीचे भूमिपूजन पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांचे हस्ते कुदळ मारून झाले. प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, जिल्हा परिषद सदस्या विद्या खोडपे, पंचायत समिती सदस्य अमर पाटील, माजी सभापती तुकाराम निकम, जामनेर पोलिस स्टेशनचे सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते