छत्तीसगडची खुर्ची भूपेश बघेल यांच्याकडे; मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब

0

रायपुर। छत्तीसगडच्या इतिहासात सर्वात मोठा विजय मिळविल्यानंतर कॉंग्रेस सत्ता स्थापन करणार आहे. मात्र कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद सुरु होता. अखेर हा वाद मिटला असून भूपेश बघेल हे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. भूपेश बघेल यांच्या रूपाने छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसचा दुसरा मुख्यमंत्री होणार आहे. यापूर्वी अजित जोगी २००० मध्ये कॉंग्रेसचे मुख्यमंत्री झाले होते.

मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून भूपेश बघेल, टीएस सिंहदेव, डॉ. चरणदास महंत आणि ताम्रध्वज साहू यांची नवे चर्चेत होती. चारही नेते दिल्लीत ठाण मांडून होते. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी चौघांची बैठक झाली. त्यानंतर राहुल गांधी यांनी चौघांसोबतचा फोटो देखील शेअर केले आहे.