भुसावळ न्यायालयात जिल्हा न्यायाधीश मा. श्री.यू. एम्. पदवाड यांचा वकील संघातर्फे निरोप समारंभ. भुसावळ -: येथील न्यायालयात शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजता भुसावळ वकील संघातर्फे जिल्हा न्यायाधीश वर्ग 2 माननीय श्री यु .एम .पदवाड यांची नागपूर येथील औद्योगिक न्यायालय मध्ये बदली झाली. भुसावळ जिल्हा न्यायालय मध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी एक वर्ष कामकाज पाहिले त्या त्यानिमित्त त्यांचा निरोप समारंभाचे आयोजन केले होते. या निरोप समारंभात त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन बारतर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला श्री आर. एम. जाधव अतिरिक्त सत्र न्यायाधीश, श्री.पांजनकर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर,श्री. डी बी. डोमाळे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ , श्री. के. एस.खंडारे दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, के.एम. पत्रे मॅडम, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, श्रीमती एस. व्हीं. न्यायाधीश दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तसेच भुसावळ वकील संघाचे अध्यक्ष अँड. तुषार पाटील साहेब, कोषाध्यक्ष ॲड. राजेश्वर कोळी,सहसचिव श्री.पी.आर.पाटील, आणि महिला प्रतिनिधी अँड जास्वंदी भंडारी,सदस्य ॲड.विजय तायडे व सर्व जेष्ठ,श्रेष्ठ वकील मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड राजेश कोळी यांनी केले. माननीय जिल्हा न्यायाधीश यांनी एक वर्षात केलेले कामकाज याबद्दल वकील संघातील वकील मंडळीला आलेले अनुभव अँड वी.आर. घोलप,अँड. धीरज शंकरपाळ, अँड मनीष सेवालानी अँड कात्यायनी साहेब, अँड वैशाली चौधरी, अँड. जास्वंदी भंडारी, अँड तुषार पाटील साहेब यांनी बेंच आणि बार मध्ये असलेले सहकार्याचे, आणि संवाद पूर्ण वातावरण संबंध , न्यायालयीन कोर्ट केस बद्दल आपल्या मनोगतात साहेबां बाबत भावना व्यक्त केल्या . श्री.यु .एम .पदवाड न्यायाधीश साहेब यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना आपल्या मनोगतात सांगितले की भुसावळ बार असोसिएशन केलेला भव्य सत्कार समारंभाची याची आठवण राहील. भुसावळ वकील संघातील प्रत्येक वकिलांमध्ये असल्यास समन्वय, विविध महापुरुषांच्या जयंती , गॅदरिंग कार्यक्रमातून दिसून येतो भुसावळ बार आदर्श बार आहे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला भुसावळ वकील संघाचे ज्येष्ठ वकिल ,महिला वकिल मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.