भुसावळ प्रतिनिधी ।
शहराच्या तापमानात दररोज वाढ होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.९ तापमानाची नोंद शहरातील केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात झाली. गेल्या तीन दिवसांतच शहराचे कमाल तापमान तब्बल ४. ३ अंशांनी वाढल्याचे या नोंदीतून समोर आले.
दरम्यान, उष्णतेच्या तडाख्याने सकाळी १० वाजेपासून शहरातील जनजीवन प्रभावित होते. दुपारी तर सर्व प्रमुख रस्ते, महामार्ग निर्मनुष्य होते. बाजारपेठेतील ग्राहकांची झाल्याने व्यवसायांवर परिणाम झाला आहे.
गुरुवारी मोचा’ वादळाने शोषले बाष्प बुधवारी सकाळी ११ वाजताच तापमानाचा पारा ४३ अंशांवर पोहोचला. नंतर दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान ४४.९ अंश तापमान नोंदवले गेले.. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोचा वादळाने वातावरणातील बाष्प शोषून घेतल्याने तापमान वाढीचे चटके बसत आहेत. १८ एप्रिलला होते ४३.९ अंश येत्या १३ मे पर्यंत तापमान उच्चांकी राहिल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. यापूर्वी १८ एप्रिल रोजी ४३.९ एवढ्या यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. हे रेकॉर्ड १० मे रोजी मोडले गेले. तज्ज्ञांचा अंदाज पाहता या तापमानात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.