भुसावळ नगर परिषदेला स्वतः जीर्ण वास्तूचा विसर

भुसावळ l शहरात गेल्या 5 वर्षात जेव्हढी विकास कामे झाली नाहीत तेव्हढी विकास कामे प्रशासकीय राजवटीत होत आहेत. शहरात नगर परिषदेच्या अनेक वास्तू जीर्ण आणि निरुपयोगी आहेत त्याचा विसर प्रशासनाला पडला आहे.9 रोजी अशाच एका वास्तुमुळे सामान्य व्यक्ती चा जीव धोक्यात आला होता पण नागरिकांच्या सतर्कतेने वाचला.

जामनेर रोड वरील सावित्रीबाई फुले व्यापारी संकुलाच्या मागे अग्निशमन केंद्राची जागा आहे. 6 मार्च 1994 रोजी ही वास्तू सेवेत आली. त्यावेळी तत्कालीन नगराध्यक्ष देवीप्रसाद शर्मा हे होते.तत्कालीन ना.अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते सदर वास्तू चे उद्घाटन झाले होते. या ठिकाणी अग्निशमन बंब ठेवण्यासाठी ची व्यवस्था तसेच त्यात पाणी भरण्यासाठी भलीमोठी टाकी जमिनीत आहे. परंतु वापरावीना असलेल्या या टाकीचा स्लॅब जीर्ण झाला असून अनेक ठिकाणी कोसळला आहे. टाकीत पाणी असुन ते खराब असल्याने त्यात किडे व घाण आहे. परिसरात डास व तशा कीटकांचा उपद्रव सुध्दा होत आहे.

9 रोजी सायंकाळी एक चहा व्यवसायिक लघुशंकासाठी जात असताना अंधारामुळे या टाकीचा अंदाज न आल्याने टाकीवरून जात होता अचानक तो टाकीत पडला .सभोताल असलेल्या नागरिकांना या घटनेचा अंदाज येताच त्यांनी विलंब न लावता त्वरित सदर इसमास टाकीच्या बाहेर काढले. घाण पाण्यात भिजलेल्या या व्यक्तीच्या अंगावर स्वच्छ पाणी टाकून स्वच्छ करण्यात आले. लागलीच मदत मिळाली नसती तर अप्रिय घटना घडली असती.

प्रशानाने त्वरित ही टाकी दुरुस्त करावी किंवा नष्ट करावी अशी चर्चा नागरिक करत आहेत