भुसावळ – येथील बाजारपेठ पोलिसांनी जामनेर रोड वरील श्रद्धा नगर येथील उषा रेसिडेन्सी मधून ३९ हजार ४२० रुपयांची एम.डी. पावडर नामक ड्रग (ता. ९) एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी एक संशयिता विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
याबाबत पोलीस गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीच्या शोधात आहेत. अखेर (ता. ९) एप्रिल रोजी जामनेर रोडवरील श्रद्धा नगर येथील रूम नंबर सहा, उषा रेसिडेन्सी मधील रहिवासी सतवंत जसवंत सिंह ( वय ३१) याने त्याचे कब्जात १३ ग्रॅम १४० मिली ग्रॅम वजनांचा एम. डी. पावडर ड्रग एकूण ३९ हजार ४२० रुपयांचा अंमली पदार्थ मानवी जीवनावर परिणाम करणारा विक्री करीत साठवून स्वतःच्या कब्जात बाळगतांना मिळून आला म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या
आदेशावरून एन.डी.पी.एस. अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सूनविण्यात आली आहे.
भुसावळ शहरात याआधी पंचशील नगर मध्ये करण्यात आली आहे. जळगांव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात एम. डी. पावडर विक्री करणारे रॅकेट सक्रिय आहे. यातील मुख्य मोरका भुसावळातील असून दहा हजार रुपये महिन्या पोटी आठ ते दहा तरूणांना कामाला लावून फोन वरून संबंधिताना घरपोच करीत आहे. एम. डी. पावडर ही सिंधेटिक औषधी आहे. याचे सेवन केल्याने मानवाची उत्तेजकता, एनर्जी, प्लेजर शक्ती निर्माण होते.